‘जरांगे पाटलांना लाईटली घेऊ नका’, देवेंद्र फडणवीस यांना कुणी दिला इशारा?
आरक्षणाचा खेळ सुरू आहे. मनोज जरांगे पाटलांना लाईटली घेऊ नका. जरांगे पाटील यांनी चिंगारी पेटवली आहे. त्याचा कधी आगडोंब उसळेल ते सांगता येणार नाही. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना 14 महिने ताटकळत ठेवलं तसं मराठ्यांना ताटकळत...
धुळे : 14 ऑक्टोबर 2023 | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या विदर्भाच्या एका संस्थेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. वकील उखे यांनी एक लेख लिहिला होता यामध्ये देवेंद्र फडणवीस असलेल्या एका संस्थेने मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात लागणारे वकील आणि सर्व खर्च या संस्थेने केला होता. असे लिहिले होते, असा गौप्यस्फोट माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना मी चुकीचा समजणार नाही. संघामध्ये असेच शिकवले जाते की माणसाच्या जातीवर नाही तर गुणांवर आरक्षण दिले गेले पाहिजे. त्या धोरणाचा फडणवीस आणि सत्ता मिळाल्यावर पाठपुरावा केला. संघाची भूमिका हीच आहे की जातीच्या जन्माच्या आधारावर नाही तर गुणांवर आरक्षण मिळाले पाहिजे असे ते म्हणाले. सदावर्ते विद्वान गृहस्थ आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय ज्ञान आहे. त्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही. असा टोला त्यांनी लगावला.