एकेकाळचे साथीदार आता राजकीय वैरी, खडसे यांनी सांगितली फडणवीस यांची ‘ती’ खास बाब? पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

| Updated on: Sep 03, 2023 | 11:05 PM

भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राज्यात एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी नवे नेतृत्व म्हणून पुढे आली. मात्र, भाजप सरकारच्या काळात या दोन्ही नेत्यांमध्ये एक दरी निर्माण झाली. कधी काळचे साथीदार राजकीय वैरी झाले.

मुंबई : 3 सप्टेंबर 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे अगदीच स्पष्ट बोलतात. एकेकाळी भाजपचे मुख्यमंत्री म्हणून त्याचे नाव घेतले जात होते. शिवसेना भाजप युती तोडण्याची घोषण केली ती याच एकनाथ खडसे यांनी. त्यानंतर भाजपला बहुमत मिळाले आणि खडसे मुख्यमंत्री होतील असे वाटत असतानाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. फडणवीस यांच्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला. याच देवेंद्र फडणवीस यांच्यावर खडसे यांनी पुन्हा निशाणा साधलाय. फडणवीस यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष मीच केलं असा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पहिल्याच आठवड्यात आपल्यावर छापे टाकण्यात आले. इन्कम टॅक्स, ईडीचा ससेमिरा फडणवीसांमुळेच आपल्या मागे लागल्याची टीकाही खडसे यांनी केलीय. तर, खडसे यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी पलटवार केला. पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Sep 03, 2023 11:05 PM
अजितदादांची नाराजी, शासन आपल्या दारी कार्यक्रमाला गैरहजेरी, नेमक काय घडतंय? पाहा स्पेशल रिपोर्ट
आधी लाठीचार्ज झाला? की दगडफेक झाली? जालन्यात नेमकं काय घडलं? पाहा tv9 चा स्पेशल रिपोर्ट