शिवसेनेचं चिन्ह कुणाला मिळणार? बघा वकील काय म्हणतात
दरम्यान शिवसेनेचं चिन्ह नेमकं कुणाला मिळू शकतं बघा वकील प्रशांत केंजळे याबद्दल काय म्हणतात.
मुंबई : आज राजकारणातली (Politics) सगळ्यात मोठी घडामोड आहे. सुनावणी काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. ठाकरे गटाकडून शिंदे विरोधात तब्बल चार याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकेवरती गेल्या काही दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली. त्यावेळेस दोन्ही बाजूने घमसान युक्तीवाद झाला. कोर्टाने दोन्ही पक्षांना पुढची तारीख एक ऑगस्ट (1 August) अशी दिली होती. मात्र या तारखेत बदल होऊन ही सुनावणी तीन ऑगस्टवर गेली. आता आज शिंदे सरकारचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे. दरम्यान शिवसेनेचं (Shivsena) चिन्ह नेमकं कुणाला मिळू शतं बघा वकील प्रशांत केंजळे याबद्दल काय म्हणतात.