Special Report : ‘धनुष्यबाण’साठी शिवसेनेत लढाई; शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरेंची?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतऱ भाजपाशी(BJP) हातमिळवणी करुन राज्याची सत्ता मिळविली. यानंतर त्यांनी आपण शिवसेनतच(Shiv Sena) असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच धनुष्यबाणावर दावा केला होता. त्यांच्या या दाव्यामुळे आता शिवसेनेत धनुष्यबाणावरुन लढाई तीव्र झाली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतऱ भाजपाशी(BJP) हातमिळवणी करुन राज्याची सत्ता मिळविली. यानंतर त्यांनी आपण शिवसेनतच(Shiv Sena) असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच धनुष्यबाणावर दावा केला होता. त्यांच्या या दाव्यामुळे आता शिवसेनेत धनुष्यबाणावरुन लढाई तीव्र झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी पत्रपरिषद घेत धनुष्यबाणावर दावा ठोकला. तसेच त्यांनी ते शिंदे गटाकडे गेल्यास नव्या चिन्हाची तयारी ठेवा असे आवाहनही कार्यकर्त्यांना केले आहे. ठाकरे म्हणाले, राज्यात एक चर्चा चालली आहे ती म्हणजे चिन्हावर. धनुष्यबाण कुणाकडे जाणार? धनुष्यबाण शिवसेनेकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. मतदान पत्रिकेवर धनुष्यबाण हे चिन्ह आहे. ते आपलेच चिन्ह आहे ते आपलेच राहणार. मात्र, कुणीही गाफील राहू नका, नव्या चिन्हाची तयारी ठेवा, असे आवाहन ठाकरे यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांना केले. सर्वतोपरी लढाई लढू, पण चिन्ह हातून गेल्यास नव्या चिन्हाची तयारी ठेवा. कमीत कमी कालावधीमध्ये नवे चिन्ह लोकांपर्यंत पोहचावे म्हणून कामाला लागा, असे आदेशही ठाकरे यांनी दिले आहेत. धनुष्यबाण चिन्ह गेल्यास ठाकरेंसमोर मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांमध्ये मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. पाहा Special Report .