शिवसेना कुणाची ? धनुष्यबाण कुणाचा ? याचा आज फैसला, निवडणूक आयोगाच्या सुनावणीकडे लक्ष

| Updated on: Jan 20, 2023 | 8:24 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारीला संपत आहे. त्यापूर्वी पक्षाची सर्वसाधारण सभा घेण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्यावतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

मुंबई : उद्धव ठाकरे ( uddhav thackarey ) यांची खरी शिवसेना ( shivsena ) की एकनाथ शिंदे ( eknath shinde ) यांची हा वाद निवडणूक आयोगाकडे ( election commision ) जाऊन पोहोचला आहे. तसेच, धनुष्यबाण या चिन्हांवरही दोन्ही गटांनी आपला दावा सांगितला आहे. यावर आज होणाऱ्या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे.

गेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी घटनेनुसार उद्धव ठाकरे हे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत अशी बाजू मांडली होती. तर, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी त्याला आक्षेप घेतला होता. त्यावर आज सुनावणी होणार असून खरी शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचे याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Published on: Jan 20, 2023 08:24 AM
सकाळी 8 च्या 24 हेडलाईन्स, 4 मिनिटांत घ्या दिवसभरातील ताज्या बातम्यांचे अपडेट
विकासकामांमुळे काहींना पोटदुखी, मळमळ आणि धडधड, मुख्यमंत्र्यांचा निशाणा कुणावर?