Special Report | भाजप-शिवसेनेचा शरद पवारांवर निशाणा, मग दादांबद्दल सॉफ्ट कॉर्नर का?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी देण्यात आल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर शरद पवार यांनी भाकरी पुन्हा फिरवल्याची चर्चा सुरु झाली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी देण्यात आल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर शरद पवार यांनी भाकरी पुन्हा फिरवल्याची चर्चा सुरु झाली. शरद पवार यांनी कार्यध्यक्ष पदी दोन नावांची निवड केली पण यात अजित पवार यांचं कुठेच नाव नव्हतं. यामुळे भाजप आणि शिवसेनेने शरद पवार यांच्यावर शाब्दिक टोले लगावले आहेत. पण हे करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत सॉफ्ट कॉर्नर दिसून येत आहे. पाहा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
Published on: Jun 12, 2023 07:34 AM