BALASAHEB THACKAREY : बाळासाहेब ठाकरे यांना कुणापासून धोका होता? शिंदे गटाच्या मंत्र्यांनी ‘हे’ कारण सांगितलं

| Updated on: Jan 19, 2023 | 8:33 AM

पट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा मुलगा जय महाराष्ट्र म्हणायचा. उच्चभ्रू हॉटेलमध्ये गेलो तरी तिथला मॅनेजर जय महाराष्ट्र म्हणायचा. ही ताकद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती.

नवी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( BALASAHEB THACKAREY ) यांनी मराठी अस्मिता शिकविली ती मला त्यांच्या पश्चात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM EKNATH SHINDE ) यांच्यात दिसत आहे. बाळासाहेबांनी घडविलेला शिवसैनिक मला दिसतो, असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ( DIPAK KESARKAR ) म्हणाले.

आपल्यासाठी जागा निर्माण करण्याची असेल तर दुसरा पक्ष फोड हे काहींचे धोरण होते. त्यामुळेच शिवसेना पाच वेळा फुटली. फोडणारे एकच होते. कधी ते कॉंग्रेसमध्ये होते तर कधी राष्ट्रवादीमध्ये, अशी टीका केसरकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता केली.

बाळासाहेब यांचे हिंदुत्व हे तत्त्व होते. जो जो हिंदुस्थान झिंदाबाद म्हणतो तो बाळासाहेबांचा शिवसैनिक असतो. जो पाकिस्तान झिंदाबाद, खलिस्तान झिंदाबाद म्हणत होते त्याला ते हिंदू मानत नव्हते. म्हणून भारतात सर्वात जास्त धोका बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवाला होता. यासाठी सर्वात जास्त सुरक्षा मातोश्रीला दिली होती. आम्ही सत्तेसाठी हिंदुत्व सोडत असू तर बाळासाहेबांच्या विचारासोबत आपण रहात नाही. म्हणून हे हिंदुत्व आपण जपले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Published on: Jan 19, 2023 08:33 AM
Pune crime : भिकारी बनून आल्या, २०० तोळे दागिने घेऊन पसार झाल्या
दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा