सहानभूतीसाठीच देवेंद्र फडणवीस यांचा खटाटोप, रोहित पवार यांचा थेट आरोप काय ?

| Updated on: Feb 14, 2023 | 8:00 AM

शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आपल्याला सहानभूती मिळावी यासाठी अशी विधाने करत असल्याचा आरोप केला आहे.

कर्जत : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल tv9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात बोलताना शरद पवार आणि अजित पवार यांच्याबाबत मोठी खळबळजनक विधाने केली होती. त्यावरून राजकीय वादळ निर्माण झाले आहे. यावर शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आपल्याला सहानभूती मिळावी यासाठी अशी विधाने करत असल्याचा आरोप केला आहे. २०१० ला विधानसभेआधी फडणवीस स्वतः मीडियासमोर बोलले की राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार नाही, त्यांच्यासोबत जाणार नाही. पण, निवडणूक झाल्यानंतर त्यांनी सकाळी शपथ घेतली. शिवसेना फुटली तेव्हा शिवसेना फोडण्यात आमचा रोल नाही, असे म्हणाले. पण, विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना फोडण्याचे कलाकार कोण आहेत हे सभागृहात सांगितले. नंतर त्यांची बदला घेण्यासाठी शिवसेना फोडली हे कबूल केले. ही त्यांची दुटप्पी भूमिका समोर आली आहे. शिंदे गटाला सोबत घेऊन काही फायदा होणार नाही असे त्यांच्या लक्षात आल्यानेच आता सहानभूती घेण्यासाठी ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.

Published on: Feb 14, 2023 07:59 AM
सत्यजित तांबे काँग्रेसचा आमदार असता तर…, बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
जिवलग मित्रानेच मुख्यमंत्री शिंदे यांची काढली लायकी, म्हणाले हिंमत असेल तर…