का झालेत विरोधी पक्षनेते अजित पवार मवाळ? पहा टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली तेव्हा त्यांना कार्यकत्यांनी विरोध केला. त्यावेळी अजित पवार यांनी नव्या नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावेळी अजित पवार पक्षात एकटेच पडले.
मुंबई : राज्याचे सर्वात आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या काहीसे मवाळ झालेले दिसताहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली तेव्हा त्यांना कार्यकत्यांनी विरोध केला. त्यावेळी अजित पवार यांनी नव्या नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावेळी अजित पवार पक्षात एकटेच पडले. कार्यकर्त्यांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे वारंवार आपल्यालाच टीकेचे धनी व्हावे लागत आहे कि काय अशी त्यांची भावना तर झाली नाही ना ? 288 मधून 16 गेले तरी देखील त्यांचे आमदार जास्त आहेत. बहुमत क्लियर आहे असे म्हणून थेट महाविकास आघाडीत खळबळ माजविणारे दादा आता क्षणात झालेत का? महाराष्ट्रातल्या काही शहरात दंगली पेटवण्याचा प्रयत्न झाला त्यावरही अजित पवारांची भूमिका मवाळ राहिली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याचे काम शेवटी राज्य सरकारच्या हातामध्ये असणाऱ्या पोलीस यंत्रणेचे असते. पोलीस यंत्रणेमध्ये राजकीय हस्तक्षेप न होता त्यांना या अशा प्रकारच्या चौकशी करण्याची पूर्णपणे मुभा दिली तर पोलीस यंत्रणात चांगल्या प्रकारचे काम करू शकते हा पाठीमागचा अनुभव आहे असे सांगत मवाळ झालेलया दादांनी अधिक भाष्य करण्याचं टाळलंय.