महाविकास आघाडीत असूनही नाना पटोले यांना का वाटतेय धोक्याची घंटा? स्पष्टच सांगितले...

महाविकास आघाडीत असूनही नाना पटोले यांना का वाटतेय धोक्याची घंटा? स्पष्टच सांगितले…

| Updated on: Jan 12, 2023 | 3:44 PM

महाविकास आघाडीत असूनही नाना पटोले यांना का वाटतेय धोक्याची घंटा? स्पष्टच सांगितले...

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( NANA PATOLE )  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM EKNATH SHINDE ) आणि भाजपवर ( BJP ) टीका केली आहे. महाराष्ट्रातील खोके सरकारचे सगळं काही आलबेल सुरु आहे. पण, ते काही काळापुरते असेल.

आगामी निवडणुकीत जनता त्यांना योग्य धडा शिकवेल. लोक त्यांना प्रश्न विचारतील आणि त्यांच्याकडे उत्तर नसेल. त्यांचे काय होईल ते मी आताच सांगणार. मी भविष्यवेत्ता नाही. त्याचे उत्तर वेळच देईल.

महाविकास आघाडी म्हणू आपण एकत्र आहोत. पण, एकत्र येऊनही आपले उमेदवार हरत असतील तर ती धोक्याची घंटा आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

Published on: Jan 12, 2023 03:44 PM
सोन्याच्या चमच्याने बदामाचे ज्यूस घेत उद्धव मोठे झाले…बावनकुळे असे का म्हणाले?
Ramdas Kadam : रामदास कदम यांनी स्पष्टच सांगितले; ‘भाजपात जाणार नाही…’