रान गव्याची रिक्षाला धडक, घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल
रान गव्याने रिक्षाला धडक मारल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं होत आहे. रान गव्याच्या धडकेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
रान गव्याने रिक्षाला धडक मारल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं होत आहे. रान गव्याच्या धडकेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक गवा समोरच्या दिशेने उधळत येत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर या गव्याने त्याच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाला धडक मारली. ही धडक एवढी जोरदार होती की, रिक्षा पलटी होता होता वाचली. या घटनेत रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे.