Sambhaji Raje अपक्ष उभे राहिल्यास भाजप पाठिंबा देणार?
संभाजी छत्रपतींना पाठिंबा द्यायचा की नाही याबाबतचे सर्व अधिकार भाजप पक्षश्रेष्ठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत,अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नवी दिल्ली: राज्यात होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणूकीवरून राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. तर संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवरी कोणाकडून मिळणार यावर राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहीलेले आहे. दरम्यान शिवसेनेने राज्यसभेसाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार (sanjay pawar) यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेनेच्या या घोषणेनंतर संभाजी छत्रपती यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत कोणतंही सूतोवाच केलं नाही. त्यामुळे संभाजीराजे राज्यसभेच्या मैदानात (Rajya Sabha Election) अपक्ष उमेदवार म्हणून उतरण्याची शक्यता आहे. तर त्यांनी शिवसेना आपल्याला पाठिंबा देईल असा आशावाद कायम ठेवला आहे. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आले आहेत.
दरम्यान आता संभाजीराजे छत्रपती यांना आता राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडूनच पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आधी राजेंना राज्यसभेवर भाजपने पाठवले होते. तेच भाजप संभाजीराजे छत्रपती यांना पुन्हा पाठिंबा देणार का असा सवाल आता विचारला जात आहे. तर संभाजी छत्रपतींना पाठिंबा द्यायचा की नाही याबाबतचे सर्व अधिकार भाजप पक्षश्रेष्ठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत,अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.