माधुरी दीक्षित राजकारणात येणार का ? या प्रश्नावर माधुरीने काय दिलं उत्तर पाहा
माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला 'पंचक' हा मराठी सिनेमा येत्या 5 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या पूर्व प्रसिद्धीचा एक भाग म्हणून टीव्ही 9 मराठीशी बोलताना माधुरी दीक्षित हीने अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली आहेत. यावेळी तिने तिच्या राजकारणातील प्रवेशाच्या वावड्यांवरही स्पष्टीकरण केले आहे.
मुंबई | 28 डिसेंबर 2023 : धकधक गर्ल माधुरी दीक्षित सातत्याने चर्चेत असते. तिच्या मोहक हास्याने अनेकांना तिने घायाळ केले आहे. आणि पडद्यावरील तिच्या पदलालित्याने प्रेक्षकांनी अक्षरश: थिएटर डोक्यावर घेतलं आहे. अशा माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांचा निर्माता म्हणून नवा रोल समोर येत आहे. माधुरीचे पती नेने यांनी ‘पंचक’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या सिनेमाची स्टारकास्ट तगडी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने माधुरी हीने तिच्या राजकारणातील प्रवेशाच्या वावड्यांवर मनमोकळ भाष्य केले आहे. माझं पॅशन क्रिएटीव्ह फिल्ड आहे. ज्यातून इम्पॅक्ट क्रिएट करता येतो. पण पॉलिटीक्स इज नॉट माय पॅशन, मला असं वाटत नाही की आय एम मेड फॉर दॅट असं माधुरीनं म्हटलं आहे. वेगवेगळ्या फिल्ड मधून लीड करता येतं. रोल मॉडेल बनता येतं. पॉलीटिक्स एक फिल्ड आहे. परंतू फिल्म, मेडीसिन, टेक्नॉलॉजीमध्ये काही व्यवस्थित केले तर जगाला फायदा होतो असं तिचे पती श्रीराम नेने यांनी म्हटले आहे.