महादेव जानकर वेगळी भूमिका घेणार का? थेटच सांगितले ‘तर INDIA सोबत चर्चा करण्यासाठी तयार…’
मोदी साहेबांनी आरक्षणाचे हे काम केलं तर ते आंबेडकर यांच्याप्रमाणे मोठे होतील. जे देशाचा कारभार चालवतात त्यांनी आधी प्रत्येक जातीचा आकडा फायनल करावा. धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर कोट्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे.
नवी दिल्ली : 11 सप्टेंबर 2023 | मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. ओबीसीमधून जर आरक्षण द्यायचं असेल तर कोटा वाढवायला पाहिजे. सर्व पक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले तर हा प्रश्न लवकर सुटेल. धनगरांची अवस्था आजही गरिबीची आहे. त्यांच्यावर आजपर्यंत अन्याय केला. सरकार काँग्रेसचे असो किंवा बीजेपीचे असो. दरवेळी अन्याय केला. तुम्ही असं का करता? राजाने ठरवलं तर काही होऊ शकते. राजाच्या मनात असेल तर सगळ्यांना सुखी ठेवू शकतात. जीआर काढायला वेळ लागणार नाही. पण, हा प्रश्न त्यांना पेंडिंग ठेवायचा आहे. पंतप्रधानांची खुर्ची घालवायला आमची ताकद निर्माण होईल तेव्हा आम्ही काय ते ठरवू. आम्ही पूर्ण भाकरी आम्हाला द्या असे कधीच म्हणत नाही. धनगर समाजाची लोकसंख्या एवढी मोठी असताना आम्ही किती टक्के आहोत? राजा बरोबर नाही. काँग्रेस आणि भाजप दोघेही समान भूमिकेत आहेत म्हणून आमचाच पक्ष आम्हाला मोठा करायचा आहे. संघर्ष करायचा आहे. उपाशी असलेल्याच्या पोटातली भाकरी काढून घेण्याची काही आवश्यकता नाही. भाजपने किमान तीन लोकसभा द्याव्यात. आम्हाला किती मंत्रीपद दिली? किती महामंडळ दिली? आता याचा विचार करावा लागेल. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माझ्याशी काही बोलणं झाले नाही. सध्या आम्ही NDA सोबत आहोत पण INDIA सोबत देखील आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत असे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.