प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले एकत्र येणार? एकत्र नसल्याने मोठं नुकसान, कुणी केला दावा?
महाराष्ट्रमधील राजकारणावर मी खुश नाही. पण, मविआ खुश आहे. कारण, त्यांना टीका करायला मिळते. महाविकास आघाडी आणि ठाकरेंची शिवसेना राज्यातील राजकारण घाणेरडं करत आहे. उध्दव ठाकरे आमचे चांगले मित्र आहे. पण...
अमरावती | 22 ऑक्टोंबर 2023 : मंत्रिमंडळ विस्तारमध्ये रिपब्लिकन पक्षाला मंत्रीपद देणार असा शब्द दिला आहे. त्याचा एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी विचार करावा. अमरावती लोकसभा आम्हाला द्यावा ही आमची मागणी नाही. खासदार नवनीत राणा यांनी NDA ला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यायचा की आणखी कोणाला हे भाजप ठरवेल. मी अनेकदा सर्वांना एकत्र आणायचा प्रयत्न केला आहे. भविष्यात एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे, राजकारणात आम्ही एकत्र नसल्याने मोठं नुकसान होत आहे. भाजपच्या सर्वच मतांना मी सहमत आहे असे नाही. कॉमन मिनिमाम प्रोग्राम वर आम्ही एकत्र आलो आहे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत.
Published on: Oct 22, 2023 11:16 PM