‘राजसाहेब, उद्धवसाहेब आता तरी एकत्र या…’, शिवसेना भवनासमोर मनसैनिकाकडून बॅनरबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने महाराष्ट्र हादरला आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं महायुतीचं सरकार आलं आहे. अजित पवार यांच्या निमित्ताने राज्यात नवं राजकीय समीकरण जुळलेलं आहे. एकीकडे राज्यात राष्ट्रवादीमुळे राजकारण तापलं असताना दुसरीकडे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन केलं जात आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने महाराष्ट्र हादरला आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं महायुतीचं सरकार आलं आहे. अजित पवार यांच्या निमित्ताने राज्यात नवं राजकीय समीकरण जुळलेलं आहे. एकीकडे राज्यात राष्ट्रवादीमुळे राजकारण तापलं असताना दुसरीकडे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन केलं जात आहे. शिवसेना भवनासमोर पोस्टर लावत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. आता तरी एकत्र या अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले आहे. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर मनसे कार्यकर्त्याने शिवसेना भवन परिसरात हे बॅनर लावले आहेत.मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. या पोस्टर्सवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे.