सहा महिन्यात मंत्री म्हणून फिरणार, ठाकरे गटाच्या नेत्याचे खळबळजनक विधान
सत्तर वर्षात काँग्रेसने कधी कुठल्या आमदाराच्या निधीवर स्टे आणला नाही. मात्र, शिंदे फडणवीस यांनी आणला. कोर्टाने सरकारला सुनावले यांच्या निधीवरचा स्टे उठवणार आहात की आम्ही उठवू असा सवाल हायकोर्टाने सरकारला केला. फार काही वेळ राहिलेला नाही सहा महिने शिल्लक राहिलेत.
गुहागर : 2 ऑक्टोबर 2023 | सत्तेत समान वाटा देऊ असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासमोर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. मात्र, फडणवीस खोटं बोलत आहेत. अजित पवार यांना सरकारमध्ये घेतल्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री केलात. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुम्ही रात्रीच्या वेळी गुपचूप भेटत होतात हे स्वतःच अनेकदा सांगता. याचा अर्थ तुमच्यातील चर्चा बंद दाराच्या आड झाल्या हे सिद्ध होत. उद्धव ठाकरे जे म्हणत होते तेच खरं होतं. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीबद्दल उद्भव ठाकरे सातत्याने शपथ घेऊन सांगत होते. एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या आमदारांच्या निधीवर स्टे आणला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री सगळ्यांना भेटलो. पण कुणीही ऐकलं नाही. शेवटी मला कोर्टात जावे लागले. आता फार काळ राहिलेला नाही. फक्त सहा महिने राहिले आहेत. सहा महिन्यानंतर हा भास्कर जाधव मंत्री म्हणून तुमच्यासमोर उभा असेल असे विधान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलंय.