शिवसेनेची धुरा राज ठाकरे यांच्याकडे जाणार?, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

| Updated on: Mar 23, 2024 | 8:29 PM

लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूकांना सामोरे जाताना एकनाथ शिंदे यांच्या मर्यादा समोर आल्याने आता शिवसेनेची धुरा राज ठाकरे यांच्याकडे भाजपा सोपविणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडील मतदार खेचण्यासाठी भाजपाने ही चाल रचली असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई : एकनाथ शिंदे यांचा वापर करुन शिवसेना फोडण्यात भाजपाला जरी यश आले असले तरीही एकनाथ शिंदे यांच्या जीवावर पुढे निभाव लागणार नसल्याचे भाजपाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता भाजपाने राज ठाकरे यांच्याकडेच शिवसेनेची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले हिंदुत्व मतदार राज ठाकरे यांच्यामार्फत आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाने ही खेळी केल्याचे म्हटले जात आहे. यावर भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता मी काही राज ठाकरेंचा प्रवक्ता नाही की शिवसेनेचा प्रवक्ता नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवसेना राज ठाकरे यांच्याकडे सोपविणार का ? याप्रश्नावर असा कुणाचा पक्ष कोणाकडे जात नसतो असे फडणवीस यांनी म्हटले आहे. महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या येण्याच्या चर्चा सुरु आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगत अधिक काही बोलण्यास नकार दिला आहे.

Published on: Mar 23, 2024 08:26 PM
हर्षवर्धन पाटील यांच्या लेकीनं सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ केला ट्वीट
शिरुरची निवडणूक रेकॉर्डब्रेक मतांनी जिंकणार, आढळराव पाटील यांचा आत्मविश्वास