उद्धव ठाकरे गटाची ‘ती’ मागणी मान्य होणार का? काय होणार आज सर्वोच्च न्यायालयात ?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी आपला युक्तिवाद केला आहे. तर आज शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करणार आहेत.
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी आपला युक्तिवाद केला आहे. तर आज शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करणार आहेत. काल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने शिवसेनेच्या फुटीवर निर्णय घेणं हा मोठा कठिण संवैधानिक मुद्दा असल्याचे मौखिकरित्या म्हटले होते. तर, ठाकरे गटाने हे प्रकरण सात न्यायमूर्तीच्या घटना पीठाकडे सोपविण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या या मागणीवर न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे. सकाळी १०.३० वाजता हि सुनावणी सुरु होणार आहे.
Published on: Feb 16, 2023 10:10 AM