अजित पवार नाराज, मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका; मंत्रिमंडळ विस्तारावरून महायुतीत वाद वाढणार?
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या एक वर्षभरापासून रखडला आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार नाराज असल्याची माहिती समोर आली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही खातेवाटपासंदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या एक वर्षभरापासून रखडला आहे. दरम्यान आज शपथविधी पार पडेल असं बोललं जात होतं. मात्र या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महायुतीत आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. काही खात्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाराजी पाहायला मिळाली. अर्थखात्यावरून अजित पवार यांची नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही खातेवाटपासंदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार काही खाती आपल्याकडे राहावीत यासाठी आक्रमक आहे. यात प्रामुख्याने अर्थ खातं आहे. अर्थखातं अजित पवार यांच्याकडे दिलं जाऊ नये, अशी भूमिका शिंदे गटाची आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं गेल्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांना अधिक निधी दिला जाईल तर इतरांवर अन्याय होईल. अशी शिंदे गटाची भूमिका आहे.
Published on: Jul 13, 2023 11:38 AM