Dhananjay Munde | उत्पन्नाची अट दरवर्षी बदलणार का? निराधार योजनेतील 21 हजारांच्या अटीवरुन धनंजय मुंडे यांनी सरकारला घेरले

| Updated on: Aug 22, 2022 | 5:32 PM

Dhananjay Munde | राज्यातील निराधार, परितक्त्या आणि अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी सुरु असलेल्या योजनांबाबत धनंजय मुंडे यांनी सरकारकडे खुलासा मागितला.

Dhananjay Munde | राज्यातील निराधार (Niradhar Yojana), परितक्त्या आणि अत्यल्प उत्पन्न गटातील (low income group) लाभार्थ्यांसाठी सुरु असलेल्या योजनांबाबत पावसाळी अधिवेशनात आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सरकारला धारेवर धरले. सरकारची या सामाजिक सुरक्षा योजनांसाठी (Social Security Group) 21 हजारांची अट काढण्याविषयीची नेमकी भूमिका काय आहे याचा मुंडे यांनी सरकारकडे खुलासा मागितला. सोमवारी अधिवेशनात (Session)चर्चेदरम्यान त्यांनी सरकारला या योजनेविषयीच्या अंमलबजावणीबाबत माहिती मागितली. या पाच ते सहा योजना या केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. या योजनांमध्ये उत्पन्नाच्या अटीवरुन सध्या वाद सुरु आहे. तसेच उत्पन्नाची अट दरवर्षी वाढवणार की तीन वर्षानंतर याविषयीचा खुलासा सरकारकडे मागण्यात आला आहे. 1 एप्रिल 2022 पासून केंद्र सरकारने या योजनांसाठी किती निधी उपलब्ध करुन दिला याची ही माहिती धनंजय मुंडे यांनी सरकारकडे मागितली आहे.

Sunil Raut | हे तर दामिनी सिनेमा सारखं तारीख पे तारीख, आमदार सुनील राऊत यांची संजय राऊतांच्या कोठडींवर तिखट प्रतिक्रिया
Ashok Chavan on Abdul Sattar | सत्तार यांची भेट घेतली, तर काय अनुचित केलं? सत्तार यांच्या भेटीवरुन अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण