Buldana : मेहकरमध्ये महिलेने चोरली सोन्याची पोत, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

| Updated on: Aug 06, 2022 | 10:48 AM

Buldana बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  अज्ञात महिलेने सराफा व्यवसायिकाची नजर चुकवून सोन्याच्या पोतीची चोरी केली. मात्र ही घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  अज्ञात महिलेने सराफा व्यवसायिकाची नजर चुकवून सोन्याच्या पोतीची चोरी केली. मात्र ही घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या मदतीने पोलीस या अज्ञात महिलेचा शोध घेत आहेत. या प्रकाराणं शहरात खळबळ उडाली आहे. महिला चोरी करत असल्याचे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून येत आहे. दागिने खरेदीच्या बहान्याने या महिलेने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दागिने पहात असताना आपल्याकडे कोणाचेही लक्ष नाही असे बघून महिलेने सोन्याची चोरी केली. त्यानंतर तीने घटनास्थळावरून पोबारा केला.

Published on: Aug 06, 2022 10:25 AM