नांदेडच्या रँचोची कमाल! चक्क दुचाकीच्या साहाय्याने बनवली लिफ्ट

| Updated on: Jun 03, 2023 | 10:58 AM

लातूरमध्ये कोणतही शिक्षण नसताना मकबूल शेख यांनी बुलेट इंजिनच्या साहाय्याने ट्रॅक्टर बनवला होता. तर एका शेतकऱ्याने देशी जुगाड वापरत मक्याचे दाणे काढण्यासाठी मोटारसायकलचा उपयोग केला होता. तर जालन्यात देवमूर्ती गावातल्या शाळकरी मुलाने वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांसाठी बंदूक बनवली होती. त्या मुलाचे ज्ञानेश्वर खडके असे होते. असे एक ना अनेक जुगाडू आपल्याकडे आहेत.

नांदेड : आपल्या राज्यात अनेक प्रकारचे करामती लोक आहेत. जे जुगाडकरून आपली कामं पटापट करतात. असे अनेक उदाहरण आहेत. लातूरमध्ये कोणतही शिक्षण नसताना मकबूल शेख यांनी बुलेट इंजिनच्या साहाय्याने ट्रॅक्टर बनवला होता. तर एका शेतकऱ्याने देशी जुगाड वापरत मक्याचे दाणे काढण्यासाठी मोटारसायकलचा उपयोग केला होता. तर जालन्यात देवमूर्ती गावातल्या शाळकरी मुलाने वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांसाठी बंदूक बनवली होती. त्या मुलाचे ज्ञानेश्वर खडके असे होते. असे एक ना अनेक जुगाडू आपल्याकडे आहेत. आता नांदेडमध्येही भन्नाड जुगाड पहायला मिळत आहे. ज्याची चर्चा होत आहे. येथे सध्या उष्णतेच्या लाटांनी नागरिक होरपळून निघतायत. अशा स्थितीत अंग मेहनत कशी करायची असा प्रश्न अनेकांच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे अंग मेहनत टाळण्यासाठी कामगारांनी केलेल्या एका जुगाडाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. शेळगाव गौरी इथल्या कामगारांनी भंगार झालेल्या मोटारसायकलच्या मदतीने लिफ्ट बनवलीय, पाण्याच्या टाकीचे बांधकाम या मोटारसायकलच्या मदतीने होतंय. कामगारांनी केलेल्या या अनोख्या जुगाडाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच कौतुक होतंय.

Published on: Jun 03, 2023 09:56 AM
VIDEO | शिवभक्तांसाठी मोठी बामती!, महाराजांच्या वाघनखांबाबत मुनगंटीवारांची मोठी घोषणा
Odisha Train Accident | रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची अपघातस्थळाची पाहणी, म्हणाले…