आनंद दिघेंनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवातील देवीच्या मंडपाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन
यंदा उत्सव धूमधडाक्यात साजरं करण्याचं ठरविलं. निर्बंधमुक्त उत्सव व्हावेत, असा निर्णय घेतला. उत्साह, जल्लोष, मनमोकळेपणानं सहभागी झालेले दिसतात, असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
टेंभीनाक्याचा नवरात्रोत्सव हा आनंद दिघे यांनी सुरू केला होता. येथे दरवर्षी हजारो लोकं दर्शनाला येतात. बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे अनेक दिग्गज येथे येऊन गेले आहेत. येथे येणाऱ्यांना देवीचं दर्शन मिळतं आणि देवीची अनुभूती आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. अशा या देवीच्या मंडपाचं पूजन झालं आहे.या ठिकाणी पूजन करण्याचं भाग्य मला मिळालं. दहीहंडी झाला तसाच नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होईल. यंदा उत्सव धूमधडाक्यात साजरं करण्याचं ठरविलं. निर्बंधमुक्त उत्सव व्हावेत, असा निर्णय घेतला. उत्साह, जल्लोष, मनमोकळेपणानं सहभागी झालेले दिसतात, असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.