पुण्याच्या भोरमधील गवडी गावात 200 पैलवानांची लढत

| Updated on: Apr 19, 2023 | 10:02 AM

पुण्याच्या भोर तालुक्यातील गवडी गावात ग्रामदैवत श्री जानूबाई देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये पुण्याच्या विविध भागातून आलेल्या 200 पैलवानांनी सहभाग घेतला होता

पुणे : राज्यात तापमानाचा पारा चढत आहे. अनेकांना उन्हाचा फटका बसत असतानाच आता कुस्तींचे फड ही लागू लागले आहे. अनेक ठिकाणी जत्रा-यात्रानिमित्त मोठ मोठ्या कुस्तींच्या स्पर्धांचं आयोजन केलं जात आहे. काही दिवसांपुर्वीच पुण्यात हिंद केसरीचा गुलाल उघळला होता. त्यानंतर आता पुण्याच्या भोर तालुक्यातील गवडी गावात ग्रामदैवत श्री जानूबाई देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये पुण्याच्या विविध भागातून आलेल्या 200 पैलवानांनी सहभाग घेतला होता. कुस्ती क्रीडा प्रकरातील सर्व वजन गटातील कुस्तीपटूंच्या स्पर्धा यावेळी घेण्यातं आल्या, कुस्त्यांचा हा आखाडा पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती.

Published on: Apr 19, 2023 10:00 AM
चौकशीचा फेरा वाढला; काल आठ तास, आजही होणार ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याची चौकशी
…म्हणून अजित पवारांचं कालचं बंड शांत झालं, पण ते तात्पुरतं; या नेत्याच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण