साताऱ्यात रोजगार मेळाव्यातच घेतला उदय सामंत यांनी ठाकरे गटाचा समाचार; तरूणांना काय केलं आवाहन?

| Updated on: May 22, 2023 | 10:07 AM

यावेळी सामंत यांनी आलेला तरुणांना नोकरी मिळाली नाही तर खचून न जाता उद्योगासाठी प्रयत्न करा असे आवाहन केलं. तसेच ठाकरे गटावर टीका करताना विरोधकांना काहीही उद्योग राहिलेला नाही त्यांना फक्त पत्रकार परिषद घ्यायचा उद्योग आहे असा टोला लगावला आहे.

सातारा : साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पस परिसरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून उद्योग विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यातील युवक युवतींसाठी रोजगार आणि स्वयंरोजगार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. यावेळी सामंत यांनी आलेला तरुणांना नोकरी मिळाली नाही तर खचून न जाता उद्योगासाठी प्रयत्न करा असे आवाहन केलं. तसेच ठाकरे गटावर टीका करताना विरोधकांना काहीही उद्योग राहिलेला नाही त्यांना फक्त पत्रकार परिषद घ्यायचा उद्योग आहे असा टोला लगावला आहे. माझं ह्रदय हे कायम तुमच्या प्रगतीसाठी धडधडत राहील. तुम्ही खूप मोठे व्हावे एवढी सदिच्छा. जिल्ह्यातील तरुण तरुणींनी उंच शिखर गाठावे. यामुळे साताऱ्याच्या वैभवात मोठी भर पडेल अशी भावना यावेळी खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केली. या महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी दीडशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तर या महारोजगार मेळाव्यासाठी दहा हजाराहून अधिक युवक युवतींनी ऑनलाईन नोंदणी केली.

Published on: May 22, 2023 10:07 AM
BMC Election | मुंबई महापालिकेचं जागांचं गणित नेमकं कसंय?
‘लढाई ऐसे लढेंगे की, विरोधी भी…’, जयंत पाटील यांच्या घराबाहेर राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी