“मणिपुरात हैवानाचे राज्य”, व्हायरल व्हिडीओ प्रकरणी यशोमती ठाकूर यांची भाजपवर टीका
मणिपूरमधील दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या व्हिडीओच्या संदर्भात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
मुंबई, 21 जुलै 2023| मणिपूर मधील दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या व्हिडीओच्या संदर्भात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. त्या म्हणाल्या की, “मणिपूरमध्ये जे घडले ते अतिशय वेदनादायक आहे. इतके दिवस असे प्रकार कसे लपून राहतात. महिलांबाबत केंद्र शासन संवेदनशील नाही. मणिपुरात भाजपचे नव्हे, तर हैवानाचे राज्य आहे. सत्य लपवून ठेवले आहे. 2 महिने पंतप्रधान काही बोलत नाही. पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे.”
Published on: Jul 21, 2023 10:45 AM