“…तर पंतप्रधान मोदी यांना लाज वाटली पाहिजे”, मणिपूरच्या घटनेवरून काँग्रेस महिला नेत्याचं टीकास्त्र
मणिपूरमधील दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 21 जुलै 2023 | मणिपूरमधील दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “ही घटना लज्जास्पद आहे. आपल्या देशात अशा घटना घडत आहेत, मग याची जबाबदारी कोणाची आहे? मणिपूर हा आपल्या देशाचा भाग आहे. अशा घटना जर तुम्हाला सहन होत असतील, तर याचं दु:ख आहे. जर मोदी याला नवा भारत म्हणत असतील तर त्यांना लाज वाटली पाहिजे. “
Published on: Jul 21, 2023 03:00 PM