Special Report |…आता शिवसेनेचे यशवंत जाधव ईडीच्या रडारवर
यशवंत जाधवांचे दोन्हीही मुलगे प्रधान डिलर कंपनीच्या संचालकपदावर होते. चोवीस महिन्यात त्यांनी अडतीस मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्या ईडीकडून नोटीस देण्यात आली आहे.
यशवंत जाधव यांनी प्रधान डिलर कंपनीच्या माध्यमातून 15 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. यशवंत जाधव मुंबई महानगरपालिकेचे स्थायी सभापती होते. महानगरपालिकेच्या टेंडरमधून त्यांनी कोट्यवधींची घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्याचबरोबर त्यांनी परदेशात संपत्ती खरेदी केल्याचे सांगण्यात आले आहे. प्रधान डिलर कंपनीच्या माध्यमातून त्यांनी 15 कोटींचा घोटाळा केल्याचे आयकरकडून उघड करण्यात आले आहे. यशवंत जाधवांचे दोन्हीही मुलगे प्रधान डिलर कंपनीच्या संचालकपदावर होते. चोवीस महिन्यात त्यांनी अडतीस मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्या ईडीकडून नोटीस देण्यात आली आहे.
Published on: May 25, 2022 11:12 PM