”ये रिश्ता क्या कहेलाता हैं?”, ललित पाटील याच्या अटकेवरून सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांना घेरलं

| Updated on: Oct 18, 2023 | 7:54 PM

अजित पवार याचं मुख्यमंत्री म्हणून नाव पुढे येताच 'मॅडम कमिशनर' हे पुस्तक कसे बाहेर येतं. अजित पवारांना रोखण्याची जबाबदारी कोणाची असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांची आहे. गेल्या वर्षी १० कोटी खर्चून एकनाथ शिंदे यांना लोक गोळा करता आली नाही. त्यामुळे आमचं हिंदुत्व काय आहे हे आम्ही त्यांना शिवतीर्थावरून सांगू.

पुणे : | 18 ऑक्टोंबर 2023 : ललित पाटील याला अटक केले ही गोष्ट चांगली आहे. पण, त्याचा अनिल जयसिंगहानी होवू नये ही अपेक्षा. ललित पाटील याला अटक करण्याचं श्रेय तुम्ही घेत असाल तर फरार करण्याचे श्रेयही त्यांना घ्यावेच लागेल असा टोला सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ललित पाटील या अटक करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तर मग त्यांना माहिती होती का? या सगळ्याचं गौडबंगाल नेमकं काय आहे? दादा भूसे यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे होत का? नाशिकमध्ये एवढ्या कोटीचा कारखाना कसा उभा राहतो ? ससून रुग्णालयातील १६ नंबर वार्डच गौडबंगाल काय? याचे सत्य बाहेर आले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. ज्या हॉटेलमध्ये ललित पाटील याचा वावर होता त्या त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जात आहेत. ”ये रिश्ता क्या कहेलाता हैं?” असा टोलाही त्यांनी लगावला.

Published on: Oct 18, 2023 07:52 PM
चिपळूणमध्ये पूल पडला, उद्योगमंत्री म्हणाले, ‘गडकरी यांना बदनाम…’
ललित पाटील याच्या आईचा ‘तो’ दावा, एकनाथ खडसे म्हणाले, ‘मलाही तसेच…’