उनके पास सत्ता, सरकार, ED, CBI है… मेरे पास भारतमाँ.. पंतप्रधान मोदींवर कुणाचा निशाणा?

| Updated on: Nov 03, 2022 | 12:53 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ सांगलीत सभा घेण्यात आली.

सांगलीः उनके पास सत्ता है सरकार है, ईडी है, सीबीआय है… मगर मेरे पास क्या है? मेरे पास भारतमाँ है…. असं वक्तव्य शेतकरी नेते योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनी केलंय. अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्या दीवार चित्रपटातील जाहिरातीद्वारे योगेंद्र यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. सांगलीत ते बोलत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ सांगलीत सभा घेण्यात आली. येत्या 7 नोव्हेंबर रोजी राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. यावेळी काँग्रेसचे मित्रपक्षही त्यांच्या यात्रेत सहभागी होतील. यासंदर्भात सांगलीतील सभेला शेतकरी नेते योगेंद्र यादव संबोधित करत होते. भाषणादरम्यान, त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

 

Published on: Nov 03, 2022 12:53 PM
सुषमाताई घसा कोरडा करत फिरतात, इकडे शिवसेना पैसे घेऊन मोकळी, संदीप देशपांडेंचा आरोप काय?
वर्षभरात 75 हजार तरुणांना नोकऱ्या, फडणवीस म्हणाले, कृपया ‘ही’ गोष्ट करू नका!