शिवसेनेला अजित पवार अर्थमंत्री नको? योगेश कदम म्हणतात, “मागचा अनुभव पाहता…”
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. पावसाळी अधिवेयशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मात्र राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठ्या घडामोडी घडत आहे. आपल्याला अर्थखातं मिळावं यासाठी अजित पवार आग्रही आहेत. तर अजित पवार यांना अर्थखातं मिळू नये यासाठी शिवसेना विरोध करत आहे.
मुंबई: राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. पावसाळी अधिवेयशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मात्र राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठ्या घडामोडी घडत आहे. आपल्याला अर्थखातं मिळावं यासाठी अजित पवार आग्रही आहेत. तर अजित पवार यांना अर्थखातं मिळू नये यासाठी शिवसेना विरोध करत आहे. यामुळे अजित पवार नाराज असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक भूमिका घेतली आहे. दरम्यान शिवसेने आमदार योगेश कदम यांनी अजित पवार यांना मागचे अनुभव असल्यामुळे अजितदादांच्या अर्थखात्याला विरोध असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, “विरोध नक्कीच आहे, त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीत असताना ज्या पद्धतीने अजितदादांनी निधी वाटप केला होता. तिन्ही पक्ष एकत्र असताना देखील राष्ट्रवादीच्या मतदारसंघांमध्ये निधी परस्पर दिला जात होता. मला वाटतं मागचा अनुभव बघता हा विरोध असावा. पण आता मला वाटत नाही तसं काही घडू शकतं.”