केसीआरच्या गुलाबी वादळाची मराठा समाजाला भुरळ!, राज्यकर्त्यांसह विरोधकांना कोणी दिला इशारा
येत्या वर्षभरात लोकसभा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात आपल्या पक्षाची ताकद वाढवत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांना सोलापुरात मोठी सभा घेतली. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी प्रवेश केला. त्यानंतर आता केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीची भूरळ आता अनेकांना पडताना दिसत आहे
धाराशिव : राज्यात लोकसभा आणि महापालिकांच्या निवडणुकांची रणधूमाळीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. तर येत्या वर्षभरात लोकसभा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात आपल्या पक्षाची ताकद वाढवत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांना सोलापुरात मोठी सभा घेतली. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी प्रवेश केला. त्यानंतर आता केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीची भूरळ आता अनेकांना पडताना दिसत आहे. तर मराठा समाजाच्या आरक्षणावरून आता सत्ताधारी भाजप शिंदे गटासह विरोधकांना मराठा वनवास यात्रेच्या तरुणानी इशारा दिला आहे. तसेच मराठा वनवास यात्रेच्या योगेश केदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्तेत बसून गेलेल्यांवर टीका केली आहे. तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सोडवला नाही तर तिसरा पर्याय म्हणून मराठा समाज हा केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीच्या मागे उभा राहिल. त्यांना सहकार्य करेल असं केदार यांनी म्हटलं आहे.