Agnipath: अग्नीपथ योजनेविरोधात बिहारमध्ये तरुणांचे आंदोलन , रेल्वे , बसेस पेटवल्या
. बिहारमधील अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांनी बसेसची तोडफोड करत बस पेटवून दिल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अनेक तरुणांना ताब्यात घेतले आहे. तरुणांनी केलेल्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिहार – केंद्र सरकारच्या (Central government)अग्निपथ योजनेच्या(Agnipath) विरोधात तरुणाचे बिहारमध्ये उग्र आंदोलन केले. आंदोलक तरुणांनी ठिकठिकाणी रेल्वे गाड्यांवर दगडफेक करत जाळपोळ केली आहे. तरुणांच्या या आंदोलनामुळे बिहारला(Bihar) जाणाऱ्या रेल्वे बंद करण्यात आल्या असून. आंदोलनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. बिहारमधील अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांनी बसेसची तोडफोड करत बस पेटवून दिल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अनेक तरुणांना ताब्यात घेतले आहे. तरुणांनी केलेल्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published on: Jun 16, 2022 05:00 PM