नागपुरात 111 बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा; नासात नोकरी लावण्याचं आमिष दाखवत फसवणूक

| Updated on: Aug 05, 2023 | 12:24 PM

नागपूरमध्ये 111 बेरोजगार तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासामध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत 5 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

नागपूर,5 ऑगस्ट 2023 | नागपूर मध्ये 111 बेरोजगार तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासामध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत 5 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फसवणुक करणाऱ्याचे नाव ओमकार तलमले असे आहे. या प्रकरणी ओमकारला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार तलमले याने 2017 पासून नासामध्ये वैज्ञानिक म्हणून सांगितले होते. तो त्याच्या संपर्कातल्या तरुणांना नासा आणि इस्रो सारख्या संस्थांमध्ये नोकरी लावून देतो अशी स्वप्न दाखवत होता. या आरोपीवर डबल मर्डरसंदर्भात गुन्हे दाखल आहेत.

Published on: Aug 05, 2023 12:24 PM
खराब रस्त्यामुळे सोलापुरकरांना नरकयातना; यमराजाने केला महापालिकेचा निषेध!
Mumbai Mega Block | मुंबईकरांनो… रविवारी घराबाहेर पडताय? ट्रेनचं वेळापत्रक बघूनचं करा प्रवास