आदित्य ठाकरे बोललेत म्हणजे खरं, शिंदे ढसा ढसा रडले; ठाकरे गटाच्या नेत्याचा दुजोरा
एकनाथ शिंदे हे ढसा ढसा रडले होते असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावरून शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटासह भाजपकडून आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला जात आहे. तर आदित्य ठाकरे यांनी जे बोलल ते सत्य असल्याचे उद्धव ठाकरे गटातील नेते म्हणत आहेत
संभाजीनगर : अख्या महाराष्ट्रात सध्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच चर्चेत आहेत. आदित्य ठाकरे यांनी शिंदे हे बंडखोरी आधी मातोश्रीवर रडल्याचे म्हणत खळबळ उडवून दिली. शिंदे यांनी तेव्हा, आपल्यामागे केंद्रीय तपास यंत्रणा लागू शकतात. भाजप अटक करू शकते असे म्हटलं होतं. तर या भीतीने एकनाथ शिंदे हे ढसा ढसा रडले होते असा गौप्यस्फोट केला होता. त्यावरून शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटासह भाजपकडून आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला जात आहे. तर आदित्य ठाकरे यांनी जे बोलल ते सत्य असल्याचे उद्धव ठाकरे गटातील नेते म्हणत आहेत. आताही ते खरं बोलत आहेत अशी पुष्टी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे बोललेत ते खरच आहे. मातोश्रीवरचं कुणीही खोटं बोलत नाही. मलादेखील हा किस्सा माहिती होता, मात्र मी आजवर बोललो नव्हतो, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलय.