…तेव्हाही हे टेबलावर उभं राहून नाचले होते; सत्तासंघर्षाच्या निकालावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

| Updated on: Sep 27, 2022 | 6:54 PM

कोर्टाच्या निर्णयावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाचा वादबाबत सुप्रीम कोर्टाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. तर एकनाथ शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. निवडणुक आयोगाची कारवाई स्थगिती याचिका शिवसेनेने केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे. कोर्टाच्या निर्णयावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. यात कोणताही दिलासा नाही. फक्त युक्तीवादाचे कोर्ट बदललेलं आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोगात युक्तीवाद सुरु राहिल. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत. आम्ही पूर्ण ताकदीने लढू आणि लढत राहणार.

आमचा संविधान, लोकशाही, न्यायदेवतेवर विश्वास आहे. हा लढा लोकशाही आणि संविधानासाठी महत्त्वाचा ठरेल असे आदित्य म्हणाले.

बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले होते तेव्हा देखील काही लोकं टेबलावर उभा राहून नाचले होते असं म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा पुन्हा एकदा गद्दार असा उल्लेख केला.

Published on: Sep 27, 2022 06:54 PM
सत्तासंघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
पीएफआयवर आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई! केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला महत्त्वाचा निर्णय