ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ; सूरज चव्हाण ईडी कार्यालयात

| Updated on: Jun 26, 2023 | 1:01 PM

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निटकवर्तींचा समावेश होता. मुंबई महानगरपालिकेच्या कथित घोटाळ्या प्रकरणी ईडीने शिवसेना युवासेना सचिव सूरज चव्हाण यांच्याही घरी छापेमारी केली होती.

Follow us on

मुंबई : काही दिवसांपुर्वीच कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबईतील जवळपास 15 ठिकाणी छापा मारला होता. यात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निटकवर्तींचा समावेश होता. मुंबई महानगरपालिकेच्या कथित घोटाळ्या प्रकरणी ईडीने शिवसेना युवासेना सचिव सूरज चव्हाण यांच्याही घरी छापेमारी केली होती. तर तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे काही कागदपत्रे सापडली होती. ज्यामुळे ठाकरे गट आणि सूरज चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यानंतर त्यांना ईडीने समन्स बजावत 26 जूनला ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे चव्हाण हे ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.