एलजीबीटी परेडच्यावेळी चेंगराचेंगरी! व्हिडीओ व्हायरल
पोलिसांनी सांगितले की, "तपासानंतर, हे निश्चित झाले की हा आवाज त्या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.
न्यूयॉर्क: न्यूयॉर्कमधील (New York)एलजीबीटी परेडच्या (LGBT Parade) वेळेस धावपळ उडालीये. याचा व्हिडीओ समोर आलाय. परेडच्यावेळी फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि याचवेळी लोकांची धावपळ झाल्याचं दिसून आलं. प्रचंड पळापळ झाल्यानं कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ सुरु झाला. मोठ्या आवाजामुळे जमाव पळून गेला आणि जवळजवळ चेंगराचेंगरी झाली. आधी बऱ्याच अफवा पसरविल्या गेल्या पण नंतर पोलिसांनी याबाबत खुलासा केलाय, न्यूयॉर्क सिटी पोलिसांनी ट्विटरवर सांगितले की, शहरातील प्राइड उत्सवाचे (Pride Month)केंद्र असलेल्या वॉशिंग्टन स्क्वेअर पार्कवर “नो फायरिंग” झाले होते, मोठ्या आवाजामुळे जमाव पळून गेला आणि जवळजवळ चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी सांगितले की, “तपासानंतर, हे निश्चित झाले की हा आवाज त्या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.अनेक प्राइड इव्हेंट्स – जे बर्याचदा जूनमध्ये आयोजित केले जातात – कोरोना व्हायरस महामारीनंतर प्रथमच या आयोजन करण्यात आलं होतं.