एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ मुंबईत बॅनर!
मुंबईत पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आलेत.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि शिवसेनेत उभी फूट पडली. त्यांच्यासोबत 47 आमदारांनीही बंड केलं. आता एकनाथ शिंदे आपल्यासोबत 50 आमदार (MLA)असल्याचा दावा करतायत. या सगळ्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. या सगळ्यात लोकं मात्र आपली बाजू क्लिअर करायला मागे राहत नाहीत. काही दिवसांपूर्वी औरंगाबादेत एकाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी बॅनर लावून अपेक्षा व्यक्त केली होती. अशीच एक बातमी आता मुंबईतून (Mumbai) समोर येतीये. मुंबईत पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आलेत.