त्यांनी त्या त्या समाजाच्या योगदानाचा उल्लेख केला मराठी माणसाचा अपमान केला नाही- नितेश राणे
त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला असं मला बिलकूल वाटत नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.
मुंबई: राज्यपाल यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलाच गोंधळ सुरु झालाय. राज्यपालांवर कुणी टीका करतंय तर कुणी त्यांच्या विधानाचं समर्थन करतंय. दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांचं समर्थन केलंय. मी त्या कार्यक्रमात होतो. राज्यपाल काहीच वावगं बोलले नाही. त्यांनी मुंबईच्या उत्कर्षात योगदान देणाऱ्या त्या त्या समाजाची आठवण करून दिली. राज्यपालांनी कुणाचा अपमान केला असता तर आम्ही बोललो असतो. त्यांनी त्या त्या समाजाच्या योगदानाचा उल्लेख केला आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला असं मला बिलकूल वाटत नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.