आर्यन खान प्रकरणी एसआयटीतर्फे चौकशी करा, नवाब मलिकांची मागणी
समीर वानखेडे खोट्या केसेस बनवून लोकांना अडकवत आहेत. त्यांचा पंच आता समोर येत आहे आणि बोलत आहे. मी आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार असून शहरात संघटित गुन्हेगारी सुरु असल्याचं निदर्शनास आणून देणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
समीर वानखेडे खोट्या केसेस बनवून लोकांना अडकवत आहेत. त्यांचा पंच आता समोर येत आहे आणि बोलत आहे. मी आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार असून शहरात संघटित गुन्हेगारी सुरु असल्याचं निदर्शनास आणून देणार आहे. प्रविण दरेकरांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचांची नाव जाहीर केली होती. त्यातील प्रभाकर साईल या व्यक्तीचं नाव पहिलं होतं. या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी करावी, अशी मागणी नवाब मलिकांनी केलीय. बोगस केसेस तयार करुन श्रीमंत लोकांना त्रास देण्याचे उद्योग सुरु आहेत, असा आरोप नवाब मलिकांनी केलाय. प्रभाकर साईलनं केलेला आरोप गंभीर आहे. राज्य सरकारनं याची दखल घेत एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी नवाब मलिकांनी केलीय.
Published on: Oct 24, 2021 02:50 PM