‘आज आले का ? अरे व्वा !’, शरद पवारांची प्रतिक्रिया

| Updated on: Apr 13, 2022 | 6:55 PM

घरीही सचिवालय असते, तसं वर्षावरही आहे. त्यामुळ ते आले नाही आले तरी राज्याचा कारभार थांबला नाही. राज्याचा कारभार सुरू आहे. त्यांच्याकडे आलेल्या फाईल पूर्ण करतात.

मुंबई : मुख्यमंत्री (Chief Minister) दोन वर्षानंतर मंत्रालयात आले, याबाबत शरद पवारांना विचारले असता, पवारांनी आज आले का? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर पत्रकारांनी (Journalists)हो असे उत्तर दिले. लगेच पवारांनी हसत अरे वा…अशी प्रतिक्रिया दिली.  तसेच त्यांच्या तब्येतीच्या कारणाने येत नव्हते. मी अनेक राज्यात बघतो. मुख्यमंत्री घरी बसूनच निर्णय घेतात. घरीही सचिवालय असते, तसं वर्षावरही आहे. त्यामुळ ते आले नाही आले तरी राज्याचा कारभार थांबला नाही. राज्याचा कारभार सुरू आहे. त्यांच्याकडे आलेल्या फाईल पूर्ण करतात. निर्णय घेतात. त्यामुळे त्याबाबतची चिंता माझ्या मनात नाही, असेही पवार म्हणाले.

 

 

Pravin Darekar : जितेंद्र आव्हाड पवारांचा जातीयवादी कव्हर आहे, प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर टीका
‘राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान’ 2025 पर्यंत वाढवले; मंत्रिमंडळ बैठकीय निर्णय 5911 कोटी निधीला मंजुरी