Yashwant Jadhav यांच्याकडून 36 मालमत्तांची खरेदी? BMCला हादरवणारी माहिती समोर

| Updated on: Mar 20, 2022 | 6:01 PM

मुंबई महापालिकेला (BMC) हादरवणारी ही बातमी आहे.  यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि त्यांच्या निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत सुमारे 36 मालमत्तांची (Properties) खरेदी केलेली आहे.

मुंबई महापालिकेला (BMC) हादरवणारी ही बातमी आहे.  यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि त्यांच्या निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत सुमारे 36 मालमत्तांची (Properties) खरेदी केलेली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेचे स्थाय़ी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत सुमारे 36 मालमत्तांची खरेदी केलेली आहे. गेल्या दोन वर्षांत हे सर्व आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर वॉटर फिल्ड  5 कोटी 10 लाख, क्रॉस रोड IV, वांद्रे, बिलखाडी चेंबर्स 2 कोटी, माझगाव, वाडी बंदर, माझगाव 1 कोटी 60 लाख, व्हिक्टोरिया गार्डन 2 कोटी  20 लाख, भायखळा असा तो तपशील आहे.

कोणत्या वर्षात किती मालमत्ता खरेदी?
2020 – 07
2021 – 24

कोणत्या महिन्यात किती मालमत्ता खरेदी?
मार्च 2020 – 1
डिसेंबर 2020 – 2
जानेवारी 2021 – 3
फेब्रुवारी 2021 – 2
मार्च 2021 – 5
मे 2021 – 1
जून 2021 – 2
जुलै 2021 – 6
ऑगस्ट 2021 – 2
डिसेंबर 2021 – 3