Ambarnath Accident | स्टेअरिंग लॉक झाल्यानं लोकनगरी एमआयडीसी रोडवर अपघात

| Updated on: Feb 27, 2022 | 6:06 PM

स्टेअरिंग लॉक झाल्यानं कारचा अपघात (Car Accident) झाल्याची घटना घडलीय. अंबरनाथमध्ये (Ambarnath) हा प्रकार घडला. लोकनगरी एमआयडीसी (MIDC) रोडवर झालेल्या या अपघातात कारवरचं नियंत्रण सुटून कार थेट दुभाजकावर चढली.

स्टेअरिंग लॉक झाल्यानं कारचा अपघात (Car Accident) झाल्याची घटना घडलीय. अंबरनाथमध्ये (Ambarnath) हा प्रकार घडला. लोकनगरी एमआयडीसी (MIDC) रोडवर झालेल्या या अपघातात कारवरचं नियंत्रण सुटून कार थेट दुभाजकावर चढली. सुदैवाने अपघातात कुणालाही फारशी इजा झाली नाही. पोलिसांकडून कार बाजूला करण्याचे काम करण्यात आले. या कारचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते, की कार कशापद्धतीने दुभाजकावर चढली. यात कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. समोरच्या तसेच उजव्या भागाचा चेंदामेंदाच झाल्याचं व्हिडिओत दिसत आहे. अपघात घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कार रस्त्यावरून बाजुला घेण्याचे काम लगेच सुरू केले. कारचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने यात कोणालाही कोणती इजा झाली नाही. कोणीही जखमी झाले नाही.
Published on: Feb 27, 2022 05:57 PM
वीज पुरवठा खंडित प्रकरणची उच्चस्तरीय चौकशी, ऊर्जामंत्री अॅक्शन मोडमध्ये
Nashik Election | भाजपमधील नाराजी, राऊतांचा बाण अन् राष्ट्रवादीचे आव्हान महाजन रोखणार का?