‘कुठल्याही सहकारी साखर कारखान्याला हमी देणार नाही’ : Ajit Pawar
प्रवीण दरेकरांवर मुंबई बँक प्रकरणात आरोप झाल्यापासून प्रवीण दरेकर साखर कारखान्यांना (Sugar Factory) टार्गेट करून आरोप करत आहेत. या आरोपांना उत्तर देताना अजित पवारांनी मोठी घोषणा केलीय. यापुढे कोणत्याही साखर कारण्याला हमी देणार नाही, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
आज विधानसभेत प्रवीण दरेकर (Pravin Darekar) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) सामना होताना दिसून आला. प्रवीण दरेकरांवर मुंबई बँक प्रकरणात आरोप झाल्यापासून प्रवीण दरेकर साखर कारखान्यांना (Sugar Factory) टार्गेट करून आरोप करत आहेत. या कारखान्यांना दिलेली कर्ज ही बेकायदेशीर असल्याचा आरोप सतत भाजपाकडून होत आहे. आजही दरेकरांनी यावरून अजित पवारांना सावला केले. दरेकरांच्या आरोपांना उत्तर देताना अजित पवारांनी मोठी घोषणा केलीय. यापुढे कोणत्याही साखर कारण्याला हमी देणार नाही, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. तसेच काही कारखाने सरकारने विकत घेतले. त्यातले काही कारखाने बंद आहेत. या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी कर्ज काढले, असे स्पष्टीकरणही अजित पवारांनी दिले आहे. मधल्या काळात सहकारी कारखान्यां संदर्भात आरोप केले गेले, परंतु सहकारी कारखाने चालवायला कोणी पुढे येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.