Shivjayanti निमित्त Osmanabadमध्ये उत्सहाचं वातावरण, महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक सजावट

| Updated on: Mar 20, 2022 | 6:16 PM

राजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती (Jayanti)  उद्या तिथीनुसार साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीची तयारी उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती (Jayanti)  उद्या तिथीनुसार साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीची तयारी उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती आकर्षक कपड्यांनी सजावट करण्यात आली आहे. या सजावटीमुळे परिसर देखणा बनला आहे. आम्ही खास ड्रोनने शूट केलेली दृश्ये दाखवीत असून उद्याच्या शिवजयंतीबाबत शिवप्रेमींमध्ये मोठा जल्लोष व उत्साह आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येत आहे, की स्वच्छ अशा कपड्यांनी पुतळ्याभोवती आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. याचठिकाणी उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तिथीनुसार, तारखेनुसार तसेच परंपरेनुसार शिवजयंती राज्यात साजरी होत असते.
सोनलला मारण्यासाठी मोसमीनं 4 लाखाची सुपारी दिली, मारेकऱ्याला Bike वरुन घरापर्यंतही सोडलं! पण…
Historical Rangotsav in Nashik | नाशिकमधील 300 वर्ष जुन्या रंगोत्सवाची चित्तरकथा; यंदा वाजत-गाजत आयोजन!