Mahashivaratri 2022 | ड्रोनच्या माध्यमातून पाहा साताऱ्यातील Rameshwar मंदिरावरची आकर्षक विद्युत रोषणाई

| Updated on: Mar 01, 2022 | 4:20 PM

साताऱ्यातील (Satara) क्षेत्रमाहुली येथे रामेश्वर मंदिरावर महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) पूर्वसंध्येला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. कोरोनाच्या (Corona) सर्व नियमांचे पालन करून शंभु महादेवाचे दर्शन भाविकांना घेतले.

साताऱ्यातील (Satara) क्षेत्रमाहुली येथे रामेश्वर मंदिरावर महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) पूर्वसंध्येला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. कोरोनाच्या (Corona) सर्व नियमांचे पालन करून शंभु महादेवाचे दर्शन व्हावे, यासाठी गावातीलच रामेश्वर मंदिर, क्षेत्रमाहुली येथील सरपंच ग्रुप आणि रामेश्वर जीर्णोद्धार मंडळ यांनी हा उपक्रम राबविला आहे. हे मंदिर 1703 सालात बांधले असून अजूनही सुस्थितीत आहे. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला क्षेत्र माहुली येथील किरण फोटोज यांच्या ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली आकर्षक विद्युत रोषणाई डोळ्याचे पारणे फेडत आहे. मागच्या दोन-तीन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक निर्बंध राज्यात लागू करण्यात आले होते. यंदा मात्र निर्बंध असले तरी त्यात शिथिलता देण्यात आल्याने भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता आले. याबद्दल भाविकांनी समाधानही व्यक्त केले आहे. कोरोनातून मुक्त व्हावे, असेच साकडे त्यांनी शंभुच्या चरणी घातले.

पवारांच्या मेहरबानीवर ठाकरेंचे सुरू, राज्यपाल चुकतील असे वाटत नाही; राणेंचा दावा
हरभऱ्याचे क्षेत्र वाढले पण दराचे काय? हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी आवक