बेळगाव सीमा प्रश्नावर तब्बल 5 वर्षांनी सुनावणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वकिलांना फोन म्हणाले…..
Maharashtra Karnataka Belgaum border issue | सुप्रीम कोर्टात आज बेळगाव प्रश्नावर सुनावणी, पाच वर्षानंतर याचिका पटलावर, मराठी भाषिकांचे लक्ष कोर्टाच्या सुनावणीकडे
मुंबईः मागील अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाय (Supreme court) प्रलंबित असलेल्या बेळगाव प्रश्नावर (Belgaum ) आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दीर्घ कालावधीनंतर आज ही सुनावणी होत आहे. यापूर्वी 2017 मध्ये कोर्टात सुनावणी झाली होती. तब्बल 5 वर्षांनी हे प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येत असल्याने सीमावर्ती भागातील नागरिकाप्रमाणेच संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडणाऱ्या वकिलांशी फोनवरून चर्चा केली. या सुनावणीच्या वेळी ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी, शिवाजीराव जाधव हे महाराष्ट्र राज्याची बाजू मांडत आहेत. तर राज्य सरकारकडून अप्पर सचिव सदाफुले हे उपस्थित राहतील. कर्नाटक राज्याने दाखल केलेल्या 12 अ या अंतिरम अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्र्यांचा वकिलांना फोन…
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन याबाबत दिल्लीतीत वकिलांशी फोनवरून चर्चा केली. महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडण्याची विनंती त्यांनी ज्येष्ठ वकिलांना केली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.