Pimpari BJP Corporater Resigne | Pimpri Chinchwadमध्ये भाजपाची गळती सुरूच

| Updated on: Mar 09, 2022 | 5:46 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला (BJP) गळती लागली आहे. पिंपरी चिंचवड भाजपमधील आणखी दोन नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. भोसरी प्रभागाचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे, चिखली प्रभागाचे नगरसेवक संजय नेवाळे यांनी आपला राजीनामा दिला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला (BJP) गळती लागली आहे. पिंपरी चिंचवड भाजपमधील आणखी दोन नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. भोसरी प्रभागाचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे, चिखली प्रभागाचे नगरसेवक संजय नेवाळे यांनी आपला राजीनामा दिला आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड भाजपामधील आतापर्यंत सहा नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपाला मोठी गळती सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपा आपला गड शाबूत कसा ठेवणार, हा मोठा प्रश्न पक्षासमोर आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या(Pimpri Chinchwad Municipal Corporation) आगामी निवडणुकीसाठीचा (Election)  बहुप्रतीक्षित प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा नुकताच जाहीर झाला. आगामी निवडणुकीत  46 प्रभाग असणार असून 139 नगरसेवक(Corporatorत्यातून प्रतिनिधित्व करणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासमोरच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

Unseason rain | जळगावच्या Chalisgaonमध्ये मध्यरात्री अवकाळी पाऊस
Good News | सोशल मीडियाचा सकारात्मक वापर सांगणाऱ्या दियाला युरोपियन युनियनची शिष्यवृत्ती, औरंगाबादचा अभिमान